लोणावळा एक्सप्रेस वे वर डस्टर कार चा अपघात,७०० किलो प्राण्यांचे मांस हस्तगत

मावळ मराठा न्युज -खंडाळा,दिनांक. २८/६/२०२५ रोजी ०६ .०० वाजण्याचे दरम्यान मौजे खंडाळा गांवचे हद्दीत पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे वरील लेन नंबर १ च्या लगत किलो मीटर नंबर ४५ च्या जवळील मुंबई बाजुकडील बोगद्या समोरील यु टर्नवरील सिमेंट डिव्हायडरला सिल्व्हर रंगाची डस्टर कार तिचा आरटीओ नंबर. MH ४८ एस ७०६३ ही वरील अज्ञात चालकाने कार मधील पाठीमागे बाजुस काळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या कागदात व पिशवी मध्ये कोणत्या तरी प्राण्याचे मांस त्यामध्ये प्राण्याचे कातडी काढलेले सोललेले मुंडके, बरगड्याचे मांस, पायाचे गुडघ्या पासुन नखा पर्यंत व मांडयाचे गुडध्या पर्यंत मांसाचे तुकडे वजन अंदाजे ७०० किलो असे बेकायदेशिरपणे पुणे बाजुकडुन मुंबई बाजुकडे स्वतः वाहतुक करून कार स्वतः चालवित घेऊन जात असताना ती हयगयीने अविचाराने रोडच्या दिसते परिस्थिती कडे व वाहतुकीच्या नियमांकडे दुलक्ष करून भरधाव वेगाने चालवुन डिव्हायडरला ठोस मारून अपघात करून कारचा ड्रायव्हर बाजुचा पुढील टायर फोडुन नुकसान करून अपघाताची खबर पोलीस स्टेशनला न देता पळुन गेला आहे. म्हणुन माझी त्यांच्या विरुध्द सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून गुन्हा रजि. दाखल करून गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा. हुजूर कोर्टात पाठवुन देण्याची तजचीज ठेवली असुन सदर गुन्हयाचा मा. वरिष्ठांचे आदेशाने पोसई वाणी यांचेकडे दिला असुन दाखल अंमलदार पोहवा/२५५८ मानकर आहेत. यात गुन्ह्यातील मुद्देमाल – १) २,६०,००० एक डस्टर कंपनीची सिल्व्हर रंगाची कार तिचा आरटीओ नंबर डस्टर कार नंबर. MH 48 S ७०६३ असा आहे. जु. वा. किं.अं.२) १,४०,००० रूपये किंमतीचे प्राण्याचे मांस त्यामध्ये प्राण्याचे कातडी काढलेले सोललेले मुंडके, बरगडयाचे मांस, पायाचे गुडध्या पासुन नखा पर्यंत व मांडयाचे गुडघ्या पर्यंत मांसाचे तुकडे वजन अंदाजे ७०० किलो. २८० रूपये दराने प्रती किलो एकुण किंमत अंदाजे.असा एकूण रुपये ४,००,००० चा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामघरे यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page