कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू,५१ जण जखमी

मावळ मराठा न्युज – कुंडमळा इंदुरी ता. मावळ येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळण्याच्या घटनेत रविवार, दिनांक १५/०६/२०२५ रोजी दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली आहे. सदर लोखंडी पूल हा आजुबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून सदर लोखंडी पूल हा सुमारे ३० वर्ष जुना पूल होता,सदर कुंडमळा या ठिकाणी अंदाजे १०० ते १२५ पर्यटक वर्षाविहारासाठी आले असता लोखंडी पुल कोसळून त्या खाली काही पर्यटक अडकले असल्याचे समजताच सदर ठिकाणी बचाव कार्यासाठी स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF चे २ पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलिस यंत्रणा, केंद्रीय राखीव पोलिस दल, आपदा मित्र,पुणे/ पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल, शिवदुर्ग संघटना, वन्यजीव संघटना यांचे मार्फत शोधकार्य सुरु केले होते.सदर दुर्घटनेमध्ये एकूण ५१ व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तीनां रुग्णवाहिकेच्या मदतीने पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. सदर घटनेत एकूण ४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून पुढील शोध कार्य सुरु आहे. अश्या मदत कार्यात नेहमीच तत्पर असणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड,दुर्वेश साठे,प्रणय अंबुरे,ओंकार पडवळ, योगेश दळवी,आकाश मोरे,सुनील शिरसट, आनंद गावडे, अनिकेत आंबेकर,संतोष दहीभाते, राजेंद्र कडू,सचिन गायकवाड, अशोक उंबरे,महेश मसने,चंदू बोंबले,दिव्येश मुनी सर,अजय शेलार,गणेश रौंदळ,सागर कुंभार,सागर दळवी,आ नंद शिर्के,अनिकेत घरडले,अनिकेत इंगवले,सागर फाटक,वैभव शेलार,मोरेश्वर मांडेकर,वन्यजीव चे निलेश गराडे, अनिष गराडे,भास्कर माळी,सत्यम सावंत, विनय सावंत, शुभम काकडे,सर्जेस पाटील, अविनाश कार्ले,रोहीदास कालेकर,दिनेश पवार,विघ्नेश पवार,अनिल आंद्रे,दक्ष काटकर,विकास दोडी, यश काकडे,प्रसाद महामुनी,गणेश ढोरे,गणेश निसाळ,कुंदन भोसले, गणेश गायकवाड,रवी कोळी,पिंटू मानकर,प्रभाकर भालेराव,जिगर सोलंकी,यश बच्चे आदींनी आपला मोलाचा सहभाग नोंदवला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page