वडगाव मावळ लीगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान


मावळ मराठा न्यूज,वडगाव मावळ, दिनांक १७ जून, २०२३ :-वडगाव मावळ लीगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वतीने याही वर्षी मावळ तालुक्यातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परिक्षेत उत्तम गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वडगाव मावळ येथील न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस.पल्लोड, न्यायाधीश कातकर,न्यायाधीश आगरवाल, न्यायाधीश चव्हाण न्यायाधीश उमरेडकर, असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दिपक चौधरी, ॲड एन. एस. दाभाडे, ॲड अशोक ढमाले, ॲड एस एम मोरे, ॲड अजित वहिले, ॲड संतोष गुंजाळ या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड धनंजय कोद्रे हे होते. यावेळी अनेक वकील, न्यायालयीन कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून आणि पेढा भरवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोणावळा येथील व्ही पी एस द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थीनी कुमारी सेजल ललित चौधरी हिने इयत्ता १२ वी सायन्स विभागात ९३ .१७ टक्के गुण मिळवून मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी न्यायाधीश आगरवाल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड मोनाली कुलकर्णी- शेलार यांनी केले. ॲड प्रणोती पिंगळे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड दीपकजी चौधरी, उपाध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, उपाध्यक्षा ॲड मिनाक्षी ढोरे, सचिव ॲड मोनाली कुलकर्णी- शेलार, सचिव ॲड राम शहाणे, खजिनदार ॲड प्रिया पंडीत, सदस्य ॲड प्रणोती पिंगळे, ॲड साक्षी मोरे, अॅड रोहिणी मुथा, ॲड प्रियांका शिंदे, ॲड मोझेस बनसोडे, ॲड प्रदिप ढोकर, ॲड अक्षय रौंधळ, ॲड प्रतिक देशमुख, ॲड अविनाश शिंदे, ॲड सागर शेटे यांसह अनेक वकील बंधु- भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.




