धर्मवीर -२ आज २७ सप्टेंबरपासून जगभरात सर्वत्र प्रदर्शित,लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने पहिल्या दिवशीचा पाहिला खेळ मोफत

मावळ मराठा न्युज:-लोणावळा आज शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सिनेब्लिस नीलकमल थिएटर , लोणावळा येथे लोणावळा शहर शिवसेनेच्यावतीने धर्मवीर -2 हा चित्रपट सर्व नागरिकांसाठी मोफत दाखवण्यात आला.धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून ढोल ताशाच्या गजरात घोषणा बाजी करत चित्रपटास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदभाऊ हुलावळे, तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, उपतालुकाप्रमुख राम सावंत, युवासेना तालुकाप्रमुख विशाल हुलावळे,देहूरोड शहरप्रमुख दीपक चौगुले, भाजपा लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, पार्वतीताई रावळ, महिला आघाडीच्या कविताताई हुलावळे, भाजपचे अर्जुन पाठारे, हर्षल होगले, मनसेचे संदीप पोटफोडे, रुपेश नांदवटे,दीपक कांबळे, संतोष जंगले,वैभव देशपांडे, राष्ट्रवादीचे कृष्णा साबळे,दिलीप पवार,यशवंत मराठे, आर्यन खांडभोर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.चित्रपटाच्या पहिल्या शोचे आयोजन शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, उपशहर प्रमुख निखिल सोमण, समन्व्यक नंदू कडू, महिला आघाडी संघटिका मनीषा भांगरे, युवासेना शहराधिकारी विवेक भांगरे, सल्लागार राजूभाऊ चव्हाण,दिलीप दुबे, सल्लागार पराग राणे, विभागप्रमुख प्रमोद लोहिरे, उपविभागप्रमुख प्रसाद कन्नन, युवासेनेचे आतिष भांगरे, शाखाधिकारी सुधांशु शेलार, शाखाप्रमुख परेश वावळे,केतन फाटक, शाखाप्रमुख संतोष दरडे,विवेक शिळावणे आदी लोणावळा शिवसेना पदाधिकारी वर शिवसैनिकांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page