पिपंरी चिंचवड नाव बदलून “जिजाऊनगर” नामकरण करण्याची भक्ती-शक्ती प्रतिष्ठानची महाराष्ट्र शासनाकडे मागणी

मावळ मराठा न्युज -पिंपरी चिंचवड शहराला जिजाऊ नगर नाव देण्याची ही मागणी वैयक्तिक वा एका संघटनेचे म्हणून पाहू नये, तर या भूमीतल्या सर्वांची सार्वत्रिक भावना म्हणून विचारात घ्यावी.स्वराज्य ही केवळ एक राजकीय संकल्पना नव्हती, तर ती एक चेतना होती धगधगतं स्वप्न आणि जळजळीत स्फुल्लिंग होतं. हे स्वप्न ज्या मनगटांनी प्रत्यक्षात आणलं ते छत्रपती शिवराय,पण शिवरायांच्या मनगटाआधी ज्या मायेच्या काळजावर ते सर्वप्रथम उमटलं… त्या होत्या माँसाहेब जिजाऊ ! त्यांच्याच पवित्र विचारांचं मूर्तस्वरूप म्हणजे छत्रपती शिवराय.शिवरायांच्या शौर्यात जितकं तलवारीचं योगदान, तितकंच मोलाचं बळ त्यांच्या माऊलीच्या संस्कारांचंही होतं. आणि म्हणूनच ज्या भूमीवर त्या माऊलीची पावलं पडली, जिथे स्वराज्याचा पहिला श्वास घेतला गेला, ती भूमी केवळ “औद्योगिक” म्हणून नव्हे, तर “ऐतिहासिक” म्हणून ओळखली गेली पाहिजे !आज आपण ज्या शहराचा उल्लेख करताना सर्रास पिंपरी-चिंचवड म्हणतो,ते नावही कालौघात आलेलं. सुमारे २५-३० छोट्या गावांच्या एकत्रीकरणातून जन्मलेलं हे शहर, प्रौद्योगिकीकरणाच्या लाटेत प्रचंड वेगाने वाढलं. परंतु या नावाला काही ऐतिहासिक ठसा नाही, आदर्शात्मक प्रेरणा नाही. आणि मग ‘PCMC’ सारख्या निर्जीव इंग्रजी संक्षेपानी उल्लेख होणं कच या ऐतिहासिक भूमीच्या नशिबी आलं. हे नाव नव्हे, तर भूतकाळाला विसरून झालेली एक डी ओळख बनली !पण आपला जाज्ज्वल्य भूतकाळ आपण का विसरायचा? ज्या मायेनं ‘शिवबा’ घडवले, या नावाने हे शहर घडवायला आपण इतके का संकोचतो? जिथं स्वराज्याचं बीज रोवण्यात नं, आज त्याच भूमीवर जिजाऊंचं नाव कोरायला आम्ही मागे का? इतके उदासीन का?साडेतीनशे वर्षांच्या या इतिहासात माँसाहेब जिजाऊंनी दिलेला वारसा आजही आपल्या यांतून वाहतोय. पण आपण त्यांच्या नावाचा, त्यांच्या त्यागाचा, त्यांच्या मायेच्या सामर्थ्याचा कधी विचार केला? त्यांच्या नावाने एखादं शहर वाखाणलं गेलंय का? की आपण केवळ रायांचं नाव उच्चारून, त्या माऊलीच्या स्मृतींना आणि तिच्या योगदानाला अंधारात टाकतो आहोत ? ज्या मातेनं या महाराष्ट्रभूमीला शिवबा दिले त्या मातेच्या नावे आज काहीतरी देण्याची वेळ आहे ही. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड हे नाव बदलून, आणि ‘जिजाऊनगर’ हे नाव आपल्या स्वराज्यस्मृतीचं नवसंजीवन ठरविण्याच्या दिशेने आपण प्राधान्याने पावलं उचलावीत.’PCMC’ हे नाव अर्थहीन झालंय हे नाव इतिहास सांगत नाही, प्रेरणा देत नाही, आणि सत्त्व जागवत नाही. आता ‘जिजाऊनगर’च हवं इथं केवळ घरं आणि उद्योग उभारणी नाही झालीय… त्याआधीही कित्येक वर्ष इथं स्वाभिमानाचा संदेश देणारा इतिहास लिहिणारी एक माता उभी राहिलीय.अशी भक्ती-शक्ती प्रतिष्ठान कडून महाराष्ट्र शासनास नम्रतेने आवाहन करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page