*सायबर फसवणूक,अमली पदार्थ व डिजिटल अरेस्ट यांच्यापासून दूर राहा – खंडाळा ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री सागर अरगडे*

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात सायबर फसवणूक, अमली पदार्थ व डिजिटल अरेस्ट या कार्यक्रमात संबोधित करत असताना खंडाळा ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री सागर आरगडे यांनी उपस्थिती विद्यार्थी, शिक्षक, लोणावळा परिसरातील पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना सायबर प्रकारातील गुन्ह्यातील घटना व प्रसंग सांगितले. त्यामध्ये जास्त आमिष दाखवणे,विश्वास संपादन करून भीती दाखवणे, पैशाची मागणी करणे, OTP मागून फसवणूक करणे, यूपीआय व क्यूआर कोड फसवणूक, फ्री जॉब ऑफर, जास्त व्याजाचे आमिष दाखवणे, चुकीची लिंक पाठवून क्लिक करणे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारांविषयी माहिती सांगितली. या प्रकारामध्ये दररोज 100 कोटींची फसवणूक नागरिकांची होत असते तसेच सेक्सटॉर्शन फसवणूक, डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक तसेच महाविद्यालयीन परिसरात रॅगिंग करून पिळवणूक करणे असे वेगवेगळे उदाहरणे देऊन उपस्थित त्यांचे प्रबोधन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख सर यांनीही आपले अध्यक्ष मनोगतात महत्त्वाचे मार्गदर्शन केले यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त मा. श्री विशाल पाडाळे सर तसेच उपप्राचार्य डॉ. विलास पाटील व पोलीस पाटील संघटनेचे प्रमुख संजय जाधव, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे सर उपस्थित होते तसेच लोणावळा व कार्ला परिसरातील ग्रामीण भागातील गावचे पोलीस पाटील उपस्थित होते त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पराग कुलकर्णी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्री धनराज पाटील सर यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page