वाढदिवसाला केक नको,फळे कापा,खोपोली येथे टरबूज कापून, द्राक्षे खाऊन अनोखा वाढदिवस साजरा

मावळ मराठा न्यूज,खोपोली -वाढदिवस म्हटला की समोर येतो केक पण आता चारशे ते सहाशे रुपयांचा केक न कापता 80, 90 रुपयांची फळे कापून वाढदिवस साजरा करा असे आव्हान आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. इंद्रसेन घोडके, श्री. संदेश माने, श्री.महेश काजळे, तसेच पत्रकार श्री. किशोर साळुंखे, कु. सन्नी पाटील यांनी आज खोपोली राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष श्री. अतुल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने टरबूज कापून तसेच द्राक्षे घाऊन वाढदिवस साजरा केला. केक कापून परप्रांतीय स्वीट मार्ट मालकांना धडधाकट बनवण्यापेक्षा शेतात राबणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांना जगवा असा शेतकरी हिताचा संदेश या वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आला व यापुढेही अश्याप्रकरे वाढदिवस फळे कापून सर्वांनी साजरा करा असा लाख मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला. केक कापण्याचा सध्याचा ट्रेंड पाहता केक न कापता फळे कापून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना अगदीच रास्त व अभिनंदनीय आहे लहान मुलांपासून ते शंभर वर्षांच्या आजोबांपर्यंत वाढदिवस थाटात साजरा करण्याची सध्या फॅशन चालू आहे. गल्लीबोळात सुद्धा पोर आपल्या मित्रांच्या वाढदिवशी केक कापून फोटो सोशल मीडियावर वायरल करीत असतात. सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचे वाढदिवस केक कापूनच साजरे केले जात असतात. पण आता मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसानिमित्त केक कापणे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे हा केक तीनशे रुपयापासून ते चार हजार रुपयांपर्यंत मिळतो केक कापल्यावर २० टक्के केक खायचा आणि बाकीचा सत्कार मूर्तीच्या तोंडाला लावायचा फेकून द्यायचा. केक शरीराला दुष्परिणाम कारक आहेत यात काही प्रमाणात केमिकलचा ही उपयोग केलेला असतो यामुळे परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन स्वीट मार्ट ओपन करून प्रचंड नफा कमवतात एकीकडे परप्रांतीय महाराष्ट्रावर आक्रमण करीत असताना महाराष्ट्रातील शेतकरी मात्र गळफास घेऊन आत्महत्या करीत असल्याचे विदारक सत्य चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे तरी यापुढे येणारे आपल्या मित्र मंडळींचे वाढदिवस केक न कापता फळे कापून साजरे करा म्हणजे आपला शेतकरी जगेल. या आधी सुद्धा सामाजिक उपक्रम करत असताना आपण फळे वाटप करत होतोच ना मग आता यापुढे केक न कापता फळे कापून वाढदिवस साजरा करा असे महेश केशव काजळे व मित्रमंडळी यांनी सर्वांना आवाहन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page