वृत्त लेखन …एक जबाबदारी … डॉ. विनया केसकर

मावळ मराठा न्युज – तळेगाव,प्रभावी वृत्त लेखन कला अवगत करण्यासाठी, कलापिनी, तळेगाव दाभाडे येथे दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी बातमी लेखन कार्यशाळा डॉ विनया केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न.
कुठल्याही कार्यक्रमाचे वृत्त लेखन हे खूप महत्त्वाचे असते आणि म्हणूनच ते प्रभावी आणि योग्य असावे यासाठी ची माहिती या कार्यशाळेत दिली गेली . प्रसिद्ध पत्रकार डॉक्टर विनया केसकर यांनी पीपीटी द्वारे ही कार्यशाळा घेतली. अगदी बातमी म्हणजे काय इथपासून ते बातमी कशी लिहावी आणि कशी लिहू नये , 5W 1H चा वापर, मथळा, सुरुवात ,तपशील, समारोप, भाषाशैली, वस्तुनिष्ठता ,बातमीचे प्रकार , प्रसिद्धी माध्यमे, छायाचित्रांचे महत्त्व, बातमी लिहिताना च्या चुका इथपर्यंत सगळे मार्गदर्शन केले गेले.
डॉ. केसकर यांनी पत्रकारिता शिकतानाचे त्यांचे अनुभव सुद्धा कथन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तर दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली सहस्त्रबुद्धे यांनी तर समारोप डॉ. अनंत परांजपे यांनी केला. कार्यशाळा आयोजनासाठी उपाध्यक्ष अशोक बकरे , योगेश राऊत आणि सम्राट काशीकर यांचे सहकार्य लाभले. भविष्यात प्रभावी बातमी लेखन आपण करू अशी सर्व प्रशिक्षणार्थी यांनी ग्वाही दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page