लोकमान्यांचे पणतू व दै. केसरीचे विश्वस्त संपादक डॅा. दीपक टिळक यांचे केसरी वाडा येथे [ पुणे ] निधन







मावळ मराठा न्युज -पुणे,लोकमान्यांचे पणतू व दै. केसरीचे विश्वस्त संपादक डॅा. दीपक टिळक यांचे केसरी वाडा येथे [ पुणे ] निधन झाले. कै. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला दै. केसरी म्हणजे स्वातंत्र्य लढाचा बाण होता. तोच दै. केसरी हळू ,हळू , एक ,एक शुरवीर गमावत चालला आहे. कै. दीपक टिळक यांनीं [ १९९५ ते २००० ] भाजपा सेना सत्तेत असतांना भाजपा प्रवेशही केला होता. माझ्याशी त्या काळात दीपक टिळक यांच्याशी खूप गप्पाही होतं असतं. आज सकाळी ८ ते ११ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी बारानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.मावळ मराठा न्युज परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली..




