हिंदी सक्ती विरोधात लोणावळा शहर मनसेच्या वतीने सर्व शाळांना राज ठाकरेंचे पत्र

मावळ मराठा न्युज-लोणावळा, दि.१८ जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत राज ठाकरे महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवले.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री.अमित ठाकरे व पक्षाचे नेते श्री.बाबू वागसकर यांच्या सुचनेनुसार राज ठाकरे हे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर अध्यक्ष श्री. निखिल हनुमंत भोसले आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत लोणावळा शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले.यावेळी उपस्थित मनसे उपाध्यक्ष श्री.दिनेश कालेकर, मा.प्रवक्ते श्री.अमित भोसले, संघटक अभिजित फासगे, निलेश लांडगे, सुनील सोनवणे, संदीप बोभाटे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, शुभम पवार कैवल्य जोशी, सुभाष रेड्डी, श्रेयस केदारी, किशोर साठे, सौरभ कराळे आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page