तळेगाव दाभाडे येथे डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते जयंत पवार यांच्या ‘बंधूंनो’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन







मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,कवी जयंत पवार यांच्या ‘बंधूंनो’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय येथे मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलधे उपस्थित होते.महाराष्ट्र साहित्य परिषद,मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे,डॉ.साहेबराव पाटील,एस.के. कुलकर्णी,संगीता पवार,आणि जयंत पवार व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत सबनीस म्हणाले, “पवार यांच्या कवितेचे समन्वयवादी स्वरूप अधोरेखित कौतुक केले. जातीव्यवस्थेच्या चौकटी ओलांडून सर्व विचारप्रवाहांना सामावून घेणारी पवार यांची कविता साहित्याला समृद्ध करणारी आहे.डॉ. मलघे यांनी समाजातील असमतोलाला त्यांनी संवेदनशीलपणे शब्द दिले असून, ‘बंधुंनो’ हा शब्द केवळ भावना नसून समर्पणाचे प्रतीक आहे असे म्हणत काव्य संग्रहाचे कौतुक करत अभिनंदन केले.यावेळी इंद्रायणी महाविद्यालय आणि अग्निहोत्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने खुल्या काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. खुल्या वयोगटासाठी अग्निहोत्र विजेत्या कवींना डॉ. सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सतीश साठे यांनी आभार मानले तर रश्मी थोरात यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जेष्ठ कवी जयंत पवार यांना मावळ एकता कलामंच आणि मावळ मराठा परिवाराच्या वतीने पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.



