मेहता म्युझिकल आयोजित: दिवाळी संध्या – सप्तरंगी गीतरंग कार्यक्रम संपन्न

मावळ मराठा न्युज -लोणावळा येथे, मेहता म्युझिकल आयोजित दिवाळी संध्या – सप्तरंगी गीतरंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोणावळा येथील महिला मंडळ सभागृह येथे शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात गायक श्री राजेश मेहता, संदीप चित्ते, संतोषी बांदल, आर्या बांदल यांनी सुमधुर गीते सादर करून संगीतमय दिवाळीचे वातावरण तयार केले व उपस्थितांची मने जिंकली.संयोजिका सौ उमा मेहता, यांनी नेहमीप्रमाणे उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले.यावेळी, गायक कलाकारांनी,
तुझ्या कृपेने, घनश्याम सुंदरा, वृंदावनी वेणू, राधा ही बावरी, अबीर गुलाल ,गवळण घागर घेऊन, चिंब पावसान रान, धुंदी कळ्यांना, राजा ललकारी , रंग बावऱ्या स्वप्नांना, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा , मन उधाण वाऱ्याचे, शुक्रतारा, अश्विनी ये ना, गोमू संगतीन ,माळ्याच्या मळ्यामंदी याड लागल, चोरीचा मामला, गालावर खळी, डीपाडी डीपांग, मल्हारवारी, दीपावली मनाई सुहानी अशी एकाहून एक सुरेल गीते सादर केली .
या कार्यक्रमात वादक प्रफुल कदम – कीबोर्ड, अतुल पटेकर – तबला/ ढोलक, सुनील बोके – ऑक्टोपॅड यांनी साथ दिली.
तसेच नमो इवेंट्स व प्रणित खानेकर यांनी ध्वनी व प्रकाश व्यवस्था सांभाळली, तसेच स्टेज व इतर व्यवस्था अनिल बांदल यांनी हाताळली.यावेळी नंदकुमार वाळंज, वत्सलाताई वाळंज, अरविंद भाई मेहता, जयश्री मेहता, धीरूभाई कल्याणजी, चंद्रकांत जोशी, मृदुलाताई पाटील, वसुधाताई पाटील, बापुलाल तारे, मनिषा बांबोरी, गोरख चौधरी, पांडुरंग तीखे, रश्मी शिरस्कर, डॉ श्रीकांत रावण, सुनीता रावण, समीर भल्ला, राजेंद्र मगनलाल, सुहास राणे, श्रुतिका राणे, दिलीप पवार, उषा भोरस्कर, नीता शाह, किरण स्वामी, संध्या गव्हले, प्रतीक्षा महाडिक, शारदा अगरवाल, भगवती अगरवाल, चंद्रकांत भोसले व अन्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page