भुशी धरण परीसरातील पर्यटकांच्या सुरक्षते बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन

मावळ मराठा न्युज:-लोणावळा,लोणावळा शहरातील प्रसिद्ध असलेल्या भुशी धरण परीसरातील काल झालेल्या दुरदैवी घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला. त्या अनुषंगाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहराच्यावतीने धरण परीसरातील पर्यटकांच्या सुरक्षते बाबत लोणावळा शहर पोलीस प्रशासना सोबत सुरक्षतेच्या मुद्यावर लोणावळा शहर पोलीस निरीक्षक श्री.सुहास जगताप यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली व या विषयी पत्रा द्वारे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक,मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले,शहर सल्लागार राम थरकुडे,उपशहरप्रमुख भगवान देशमुख,उपशहरप्रमुख नरेश काळवीट,उपशहरप्रमुख नागेश दाभाडे,लोणावळा शहार प्रवक्ते अनिल कडु,धिरज घारे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page