लोणावळ्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार;तीन जणांवर गुन्हा दाखल






मावळ मराठा न्युज – लोणावळा, लोणावळ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; याबाबत जुना खंडाळ्यातील करण राजू सपकाळ (वय २५),योगेश राजू भार्गव (वय २३) आणि तन्मय भरत कुडवे (वय १९) या तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षे ११ महिन्यांची आहे. दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास मुंबईतील जोगेश्वरी रेल्वे स्थानक परिसरातून तसेच लोणावळा येथील एका बंगल्यावर ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रारीनुसार, आरोपींनी अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यातून पळवून नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर एका व्हिलावर नेऊन आरोपी क्रमांक एक याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे आत्महत्या करत असल्याचे सांगण्यास भाग पाडून डायल ११२ वर आत्महत्येबाबत खोटी माहिती दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) २०१२ अंतर्गत कलम ४, ८, १२ आणि १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक लोकरे करीत आहेत.याबाबत लोणावळा शहर पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी पत्रकारांना माहिती दिली.



