*उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष वळसे पाटील,पुणे जिल्हा सल्लागारपदी ऍड संजय पाटील तर विजय सुराणा यांची राज्य परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती*

मावळ मराठा न्युज -पुणे, उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आंबेगाव येथील पुढारीचे पत्रकार संतोष वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर यांनी पुणे उत्तर जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी आज जाहीर केली.पुणे जिल्ह्याचा वाढता विस्तार आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून पुणे जिल्ह्याचे विभाजन करीत उत्तर आणि दक्षिण पुणे जिल्हा पत्रकार संघ निर्माण करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या स्वतंत्र कार्यकारिणी निर्माण करण्यात येत आहेत. पुणे महानगर आणि पिंपरी – चिंचवड पत्रकार संघाचे स्वतंत्र अस्तित्व राहणार असून हे दोन्ही संघ थेट परिषदेला जोडलेले असतील. उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघात जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड, शिरूर, हवेली या सहा तालुक्यांचा समावेश आहे.संयुक्त जिल्हा संघाची बैठक नुकतीच मुळशी येथे संपन्न झाली.या कार्यकारिणीची मुदत एक वर्षाची असेल. या काळात दोन्ही जिल्हा संघांनी सदस्य नोंदणी करून मतदार यादी अद्ययावत करावी, असे त्यांना सूचित करण्यात आले आहे. नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणेहनुमंत देवकर : उपाध्यक्ष, चाकण.सचिन कांकरिया : उपाध्यक्ष, जुन्नर.दत्ता भालेराव : सरचिटणीस, खेड.संजय बारहाते : कोषाध्यक्ष – शिरूर.रवी पाटील : जिल्हा निवडणूक प्रमुखऍड.संजय पाटील : जिल्हा कायदेशीर सल्लागार.मावळ येथील ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांना थेट परिषदेवर घेण्यात आले असून त्यांची परिषद प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, सुनील लोणकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यकारिणीतील अन्य पदे तसेच डिजिटल मिडिया परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि महिला आघाडीच्या नियुक्त्या देखील लवकरच जाहीर करण्यात येतील, असे शिवराज काटकर यांनी जाहीर केले आहे.उत्तर पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आंबेगाव येथील दैनिक पुढारीचे जेष्ठ पत्रकार संतोष वळसे पाटील यांची नियुक्ती झाली आहे.तसेच मावळ तालुक्यातील जेष्ठ पत्रकार,साप्ताहिक मावळ नागरिक,एम एन न्युज आणि मावळ मराठा न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक ऍड.संजय पाटील यांची जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी, तर ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मावळ तालुक्यातून दैनिक सकाळ चे जेष्ठ पत्रकार विजय सुराणा आणि साप्ताहिक मावळ नागरिकचे मुख्य संपादक ऍड. संजय पाटील यांची जिल्हा आणि राज्यावर निवड झाल्याने त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page