लायन्स क्लब सुप्रिमोजने आर्थिकदृष्ट्या मागास तीन विद्यार्थ्यांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरून जपली सामाजिक बांधलकी

मावळ मराठा न्युज -लोणावळा, लायन्स क्लब ऑफ सुप्रिमोज,जिल्हा अधिकारी,हितचिंतक आणि मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक २ जुलै २०२५ रोजी लोणावळा येथील ३ आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरून सामाजिक बांधलकी जपत शिक्षणापासून कोणी गरीब वंचित राहू नये या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या ३ विद्यार्थिनी डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूल मध्ये शिकत आहेत आणि ही फी क्लब अध्यक्ष एमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांनी प्रायोजित केली. यावेळी उपस्थित एमजेएफ ला. सुधीर कदम, लायन विश्वनाथ पुट्टोल आणि डीसी इमेज बिल्डिंग एमजेएफ लायन अमीन वाडीवाला यांनी शाळेचे मुख्याध्यापक गावडे सर यांना सदर पाल्याची फी शुल्क सुपूर्द करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page