लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने डॉ बी एन पुरंदरे शाळेत गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

मावळ मराठा न्युज -लोणावळा,२६ ऑगस्ट — लायन्स कलब ऑफ लोणावळा यांच्या वतीने डॉ. बी एन पुरंदरे विद्यालय येथे गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून रीतिका अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पर्यावरण पूरक गणपती बनवण्याचें प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. या कार्यशाळेत जवळपास १२० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.कार्यशाळा संपल्यावर विदयार्थ्यांना बिस्किटे चॉकलेट वाटण्यात आली.यावेळी अध्यक्षा साधना तातिया आणि सुमित भदेशिया, कविता नायर, सरिता अग्रवाल, संतोष अग्रवाल उपस्थित होते. मुलांच्या उत्साहाचे कौतुक करत त्यांनी भविष्यातही असे सर्जनशील कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page