मावळच्या जनतेला केवळ स्वप्न दाखवले नाही तर त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले- सुनील शेळके



मावळ मराठा न्युज :-वडगाव मावळ,आमच्या सुनील आण्णाने ने मावळच्या जनतेला केवळ स्वप्ने दाखवली नाहीत तर सर्वसामान्य मावळ वासियांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली म्हणून आम्ही आमच्या सुनील आण्णा च्या सोबत असल्याच्या भावना मावळातील जनता व्यक्त करत आहेत. मागील २५ वर्ष हा मावळ तालुका विकासाकडे आ वासून बघत होता मात्र या राज्यकर्त्यांनी येथील तालुक्याच्या विकासाकडे कानाडोळा करत केवळ स्वतःची घरे भरण्याकडे लक्ष दिले. राज्यात सत्ता असताना व तालुक्याची एक हाती मजल असताना देखील कधीही तालुक्याच्या विकासाला महत्त्व न देणारे आज मावळ तालुक्यात विकासाची गंगा आणणाऱ्या विकास पुरुषांवर टीका टिपणी करत वैयक्तिक द्वेष व्यक्त करत आहेत. स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी मावळ तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या डोक्यामध्ये नको नको ते भरून काही मंडळी तालुक्याच्या राजकारणाला, येथील संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे. मावळ तालुक्यामध्ये मागील पाच वर्षे आमदार सुनील शेळके काम करत असताना प्रत्येक गावाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी ठेवली. वेगवेगळे प्रकल्प या मावळ तालुक्यामध्ये आणत येथील पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करत मावळ तालुक्यातील आरोग्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काम केले आहे. लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयाचा ठराव करण्यात त्यांनी सात वर्षे घालवली तर पाच वर्षात सुनील आण्णांनी रुग्णालय उभे करत सर्वसामान्य लोणावळाकरांना दिलेला शब्द पाळला आहे. म्हणून आज जनता ही आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. महाराष्ट्रातील आराध्य दैवत असलेल्या आई एकवीरा देवीच्या मंदिराच्या विकासासाठी ज्यांनी २५ वर्षात एक रुपया देखील निधी दिला नाही. ते आज आई एकवीरा देवीच्या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांवर बोलत आहेत. मावळ तालुक्याचा घटक भाग असलेल्या दुर्गम व डोंगर भागांमध्ये मागील ७५ वर्षांमध्ये वीज पोचली नाही, रस्ते झाले नाहीत. अशा नागरिकांकडे याच मतलबी राजकारण्यांनी काना डोळा करत केवळ मतांचे राजकारण केले. त्या ठिकाणी आज आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. म्हणून तेथील जनता आमदार सुनील शेळके यांच्यासोबत आहे. मागील आठ वर्षांमध्ये ७० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची ने – आणि आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून दहावी बारावीच्या परीक्षा कालावधीमध्ये करण्यात आली आहे. शेकडो मुलांना शाळेत जाण्यासाठी सायकली वाटप करण्यात आल्या आहेत. माता भगिनींच्या हाताला काम मिळावे, त्या स्वावलंबी व्हाव्यात, स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा, यासाठी त्यांना शिवण क्लास चे शिक्षण, केक बनवण्याचे शिक्षण, गावोगावी जाऊन देण्यात आले आहे. म्हणून आज मावळ तालुक्यातील माता-भगिनी आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. लोणावळ्यात ग्लास स्काय वर्क, अंदर मावळा मध्ये कुसुर पठाराचा विकास हे मोठे प्रकल्प आमदार सुनील शेळके यांनी मावळात आणले म्हणून जनता आमदार सुनील शेळके यांच्या सोबत आहे. आमदार सुनील शेळके यांनी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मावळातील जनतेला स्वप्न दाखवली नाहीत तर प्रत्यक्षात रस्त्यावर उतरत काम करत त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी दिवस रात्र एक केली आहे. मदत नव्हे कर्तव्य या भावने मधून ही कामे करण्यात आली आहेत. माझ्या मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळावे, त्यांचा स्वतःचा रोजगार, स्वतःच्या उद्योग,व्यवसाय मधून तयार व्हावा, या मावळ तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक विशेष महत्त्व प्राप्त करून द्यावे व जे प्रकल्प हाती घेतले आहेत ते पूर्णत्वास नेऊन या मावळ तालुक्याला सर्वांगीण दृष्ट्या विकसित करण्याचे माझे स्वप्न असल्याचे आमदार सुनील शेळके सांगत आहेत. याच करिता मला पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी प्रचार शुभारंभाच्या निमित्त मावळ वासियांना केले आहे. आमदार सुनील शेळके यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी वडगाव मावळ येथे स्वयंस्पुर्तीने जमलेले हजारो नागरिक हे आमदार सुनील शेळके यांच्या विजयाची खात्री देत आहेत. गावोगावी त्यांच्या संवाद बैठकींना मिळत असलेला प्रतिसाद हीच त्यांच्या कामाची पावती आहे. काही नेत्यांची पोटे भरले नाहीत, म्हणून ते माझ्या विरोधात गेले आहेत. पण माझ्या मावळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक हा सुखी व्हावा, त्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे आमदार सुनील शेळके सांगत आहेत.




