शनिवारी मिळालेल्या सुट्टीचा विद्यार्थ्यांनी योगा आणि मेडिटेशनचा लाभ घ्यावा- जितेंद्र कल्याणजी

मावळ मराठा न्युज – लोणावळा,माजी शिक्षण मंडळ सभापती श्री जितेंद्र कल्याणजी टेलर यांनी लोणावळ्यातील प्रत्येक शाळेला शनिवारी सुट्टी देण्याचे आवाहन केले होते आणि ते सर्व शाळांनी मान्य केले. याच संधीचा उपयोग मुलांचे आरोग्य जास्तीत जास्त चांगल व्हावं यासाठी महिला मंडळ लोणावळा यांनी प्रत्येक शनिवारी सकाळी आठ ते नऊ मुलांसाठी फ्री योगा आणि मेडिटेशन सुरू केले आहे. आज पहिलाच शनिवार सुट्टीचा आणि लगेचच सूक्ष्म योगा फौंडेशन ने योगा सुरू केला आहे. या मोफत योगा आणि मेडिटेशन चा जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना या ठिकाणी पाठवून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. यासाठी वयोमर्यादा आहे वय वर्ष दहा ते अठरा पर्यंत. त्यासाठी ९३७०६६०१२० या नंबर वर संपर्क साधावा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page