महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळच्या केतन घारे व संकेत ठाकूर यांना कांस्यपदक

मावळ मराठा न्यूज़ :- लोणावळा :- धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल केतन नथु घारे व उर्से गावचा राष्ट्रीय पदक विजेत्या संकेत दामू ठाकूर यांनी कांस्यपदक पटकावले आहे. दोघांनी गतवर्षी कोथरूड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा नुकतीच धाराशिव येथे पार पडली. या स्पर्धेत मावळातील संकेत ठाकूर, केतन घारे व अभिषेक हिंगे या तीन मल्लांनी पुणे जिल्हा कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित राज्य अजिंक्यपद कुस्ती व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. यामध्ये केतन नथु घारे यांने गादी विभागातील ६५ किलो तर संकेत दामू ठाकूर याने ७० किलो वजनी गटात नेत्रदीपक कुस्त्या करून कांस्यपदक पटकावले आहे. गतवर्षी कोथरूड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दोघांनी आपआपल्या वजनी गटात कांस्यपदक पदक पटकावले होते. संकेत ठाकूर यांचे हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील हे तिसरे तर केतन घारे याचे हे दुसरे पदक आहे. तसेच संकेत ठाकूर यांने दोन राष्ट्रीय स्पर्धेत पदके पटकावली आहेत. विजेत्या मल्लांचे मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे आश्रयदाते व अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै.चंद्रकांत सातकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व ऑलंम्पिकवीर कुस्तीगीर पै.मारूती आडकर, , कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, अध्यक्ष पै.खंडू वाळूंज, सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर पै.बंडू येवले, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पै.शंकर कंधारे, उपाध्यक्ष व विद्यापीठ चॅम्पियन पै.सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन पै.पप्पु कालेकर, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. भरत लिमण, निवृत्ती काकडे, नागेश राक्षे, सुरेश आगळमे, धोंडिबा आडकर, बाळासाहेब काकरे, बाळासाहेब वाळूंज, शंकर देशमुख, नारायण आडकर, चंद्रकांत शिंदे, पै.विष्णु शिरसाट, संघाचे सल्लागार पै. राजु बच्चे, पै.देविदास कडू, पै.गजानन राक्षे, गुलाबराव जाधव, नारायण आडकर, नथु घारे, विश्वास वाघोले, नागेश वाडेकर, गोरख लिमण यांनी अभिनंदन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page