कामशेत रेल्वे स्टेशनवर तरुणाचा खून करणाऱ्याचा तपास कामशेत पोलिसांनी कसोशीने लावून स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग,पुणे यांच्या दिला ताब्यात

मावळ मराठा न्यूज :- कामशेत, दिनांक २३/०४/२०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कामशेत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर कठड्यावर एक २२ ते २५ वयोगटातील इसमाचा खून करून बॉडी मयत अवस्थेत मिळाल्याने सदर मयताचा व मयताचा खून करणाऱ्या आरोपीचा तपास सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, यांचे मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पो.नि संजय जगताप, सहा. फौजदार अब्दुल शेख, सहा.फौजदार समीर शेख, पोलीस हवालदार श्री गणेश तावरे, श्री सुहास सातपुते, एस डोईफोडे, होमगार्ड सुधीर घारे या पथकाने शीघ्रगतीने करून त्यातील मारेकरी आरोपी नामे संतोष महादेव घाटे सध्या राहणार फिरीस्ता कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे मुळगाव अमरावती असे आरोपीचे नाव निष्पन्न करून त्यास कामशेत परिसरात शोध घेऊन त्यास शितापीने ताब्यात घेण्यात आले आहे तसेच त्याच्यासोबत इतर दोन साथीदार असल्याबाबत समजत आहे तसेच खून झालेल्या व्यक्तीची तात्काळ व्हाट्सअप वर व मोबाईलवर सर्वत्र माहिती पाठवून त्याची ओळख पटवण्यात आलेली असून सदर खून झालेल्या व्यक्तीचे नाव – विजय सतू भोंडवे वय २२ राहणार भाजगाव गाव तालुका मावळ जि पुणे असे आहे. त्याबाबत आर पी एफ पोलीस स्टेशन चिंचवड या ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे. आरोपी संतोष महादेव घाटे यास स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील सदर खुनाचा तपास आर पी एफ हे करीत आहेत

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page