लोणावळा नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियानात देशपातळीवर दखल, कचरामुक्त शहरांतर्गत ५ स्टार मानांकनराष्ट्र्पती यांचे हस्ते सन्मान

मावळ मराठा न्युज – लोणावळा,स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व २०२५ च्या सुपर स्वच्छ लीग या विशेष श्रेणीत लोणावळा नगरपरिषदेणे यश मिळवलेले आहे. याबाबत माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते दिनांक १७ जुलै २०२५ रोजी बक्षीस देऊन गौरविण्यात आलेले आहे. लोणावळा नगरपरिषदेने २०२१ पासून सातत्याने राष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी करून बक्षीस प्राप्त केल्याने तसेच सन २०२४ व २०२५ मध्ये पार पडलेल्या स्वच्छ भारत अभियाना स्पर्धे अंतर्गत विशेष कामगिरी केल्याने या अभियानांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या सुपर स्वच्छ करण्यासाठी लीग श्रेणी मध्ये ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या श्रेणी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या मार्फत बक्षीस देऊन गौरविण्यात आलेले आहे. या श्रेणीमध्ये लोणावळा नगर परिषदेने नवी दिल्ली, तिरुपती अंबिकापूर यांसारख्या महानगर शहरांसोबत स्पर्धा करून बक्षीस प्राप्त केलेले आहे. तसेच लोणावळा नगरपरिषदेने कचरामुक्त शहरांतर्गत ५ स्टार मानांकन प्राप्त केले आहे. तसेच नगरपरिषदेने गेल्यावर्षीप्रमाणे शहराचे वॉटर प्लस नामांकन कायम ठेवले आहे. नगर परिषदेने केलेल्या या विविध कामगिरीमुळे ५०००० ते ३ लाख लोकसंख्या या गटामध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. याबाबत स्वच्छतेच्या अनुषंगाने कायम प्रयत्नशील असणारे शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध संघटना, नगरपरिषदेचे अधिकारी व शहराची कायम स्वच्छता राखण्यासाठी कायम कार्यरत असणारे सर्व सफाई कर्मचारी यांच्या प्रयत्नातून व सातत्यपूर्ण सहकार्यातून लोनावळा नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीयस्तरावर सातत्य राखल्याने या यशात वरील सर्वांचा मोलाचा वाटा असल्याचे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. १७ जुलै २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बक्षिस वितरण सोहळ्यात नगरपरिषदेने केलेल्या कामगिरी बाबत माननीय राष्ट्रपती महोदय यांच्यामार्फत लोणार नगरपरिषदेत सर्टिफिकेट व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलेले आहे. नगर परिषदेमार्फत सदरचे बक्षीस महाराष्ट्र राज्याचे नगर विकास खात्याचे राज्यमंत्री, श्रीमती. माधुरीताई मिसाळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे व नगरपरिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्री. यशवंत मुंडे यांनी स्वीकारले. तसेच या बक्षीस सोहळ्यास नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष खाडे, श्री. विवेक फरतडे व मुकादम श्री. यशवंत वाघमारे आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page