मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाने साजरा, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शाश्वत सुविधा उभारण्याचा निर्धार- देविदास कडू






मावळ मराठा न्युज -लोणावळा,ता.२२ जुलै-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पक्षाचे गटनेते देविदास कडू मित्र परिवाराच्या वतीने शहरातील शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भरविण्यात आलेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना गटनेते देविदास कडू म्हणाले, “विद्यार्थ्यांचा विकास हीच खरी गुंतवणूक आहे. संस्कारक्षम विद्यार्थी म्हणजे देशाचे उज्ज्वल भविष्य. त्यांना दर्जेदार व शाश्वत सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यात अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ठोस आणि दीर्घकालीन योजना राबवणार आहोत.” कार्यक्रमात विद्यार्थींच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान दिसून येत होते. उपक्रमाच्या आयोजनामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात आले. हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या हितासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शैक्षणिक आधाराचे पाऊल पुढे — फडणवीस यांच्या कार्यशैलीप्रमाणेच या उपक्रमातून शिक्षणविषयक जाणिवा वृद्धिंगत करत नव्या पिढीसाठी भक्कम पाया रचण्याचा संकल्प देविदास कडू यांनी केला आहे. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष सोनवणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी, दादा धुमाळ, राजेंद्र चौहान, अरुण लाड, गटनेते देवदास कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष विलास बडेकर, लोणावळा शहर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भोईर, ज्येष्ठ नेते अरविंद मेहता, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, अर्पणा बुटाला, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, भाजपा नेत्या अश्विनी जगदाळे, सुषमा कडू, अश्विनी लाड, दिपाली कांबळे, भरत भरणे, राजू परदेशी, युवक अध्यक्ष प्रथमेश पाळेकर, शशिकांत मानकर, बाबू संपत, अरुण काका जोशी, सरपंच सिद्धार्थ कडू, श्रवण चिकणे, उद्योजक गिरीष पारेख, संतोष चोरडिया, सुनील कचरे, शैलेश कचरे, अविनाश पवार, विशाल पाठारे, जयप्रकाश परदेशी, आयुष कांकरिया, सिद्धार्थ आंबोरे, शुभम मानकामे, अमित चोरडिया, दीपक कांबळे, ऋतिक हरिश्चंद्रे, स्वप्नील सावंत, शैलेश ठाकर, अनिल बांदल, श्री. वास्कर, प्रकाश कालेकर, सचिन साठे, अविनाश शिंदे, बालकृष्ण चिकणे, पोपट शिंदे, विजय मानकर, योगेश दळवी, मारुती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.




