जागतिक चिमणी दिन निमितसामाजिक बांधिलकी जपत पक्षाची काळजी घेणारा संगिता जोगदंड यांचा लेख

मावळ मराठा न्युज – पिंपरी,महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार संगिता जोगदंड यांनी केलेली सामाजिक बांधिलकीतून पक्षासाठीची केलेली पाण्याची व धान्याची सोय.शहरात चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे, जागतिक अहवालानुसार ६२ % पेक्षा जास्त खेड्याचे रूपातर शहरात झाले आहे. शेत जमीन नामशेष होऊन सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे जंगल निर्माण होऊ लागले आहेत. पक्षांचा शहरातील अधिवास कमी होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकीतून पक्षाची काळजी घेण्याचे आव्हान मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगिता जोगदंड यांनी जागतिक चिमणी डे दिना निमित्ताने केले आहे. प्रदूषणामुळे चिमण्या बरोबरच इतरही पक्षाचा ही आदिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लहानपणी अंगणातील चिमण्यांची घरटे किलबिलाट ऐकायला मिळायच यावेळी मला ग. दि. माडगूळकर यांचा ” या चिमण्यांनो परत या ” हे गाणे आठवते याप्रेरणेने दरवर्षी मी फेब्रुवारीपासूनच चार महिने चिऊताई साठी प्लास्टिकच्या भांड्यामध्ये घरासमोर, गँलरीत पाण्याने भरलेले टोपले व टेरेसवर धान्याची गेल्या 6 वर्षांपासून धान्याची सोय करत आहे.संगिता जोगदंड म्हणाल्या की मोबाईलचे टावर ,विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होत आहे, तसेच वायू प्रदूषण,पिकासाठी शेतीमध्ये वापरले जाणारे रसायनिक औषधे ,खते,रसायुक्त पाणी नदी पात्रात येते यामुळे चिमण्यांचा अधिवास कमी होत चाललेला आहे .प्रत्यकने आपापल्या परीने चार महिने तरी पाण्याची सोय करावी .आण्णा जोगदंड म्हणाले की चिमण्या पहाटेपासून गॅलरी येतात त्यांचा आवाज ऐकून खूप आनंद वाटतो एक प्रकारचे घड्याळाप्रमाणे सकाळी सकाळी आवाज देतात यामुळे आम्हाला त्याची सवय झाली आहे. माझी पत्नी संगिता जोगदंड त्या पण त्याची काळजी घेतात आमचे कौटुंबिक नाते असल्यासारखे वाटते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page