पांगळोली,धनगर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेचे भुमिपुजन थाटात संपन्न






मावळ मराठा न्यूज -वरसोली,पांगळोली,धनगर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेचे भुमिपुजन नुकतेच वरसोली गावचे प्रथम लोकनियत्क सरपंच श्री संजय बबनन खांडेभरड व गावचे उपसरपंच आरविंद बालगुडे, सदस्य नारायणभाऊ कुटे,राहूल सुतार, विजय महाडीक,सौ मंदाताई नामदेव पाटेकर,नलिनि दत्ता खांडेभरड,रजनी कुटे,सिता ठोंबरे, मिना पांडु शिंदे,ग्रामसेवक दिपक शिरसाट तसेच मा. सरपंच बबन खरात,मा उपसरपंच राजु खांडेभरड, कॅन्टॅक्टर राजु जानकर,पांडू शिंदे, बाळू हिरवे, संजय ठीकडे, बारकू खरात, नामदेव पाटेकर,मा उपसरपंच दत्ता खांडेभरड,जि.प शिक्षक जितेन्द्र सोनवणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोडकळीस आणि अत्यंत बिकट झालेल्या शाळेचे रूपांतर आता भव्य दिव्य आणि प्रशस्थ अशी इमारत उभी राहिल ही गावासाठी आणि या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दृष्टीने अभिमानाची बाब आहे. या भव्य दिव्य इमारत होण्यासाठी सदर कामा करिता स्वामी रामानंद चारिटेबल ट्रस्ट,वरसोली याच्या तर्फे चेअरमन मा. जी विजयजी कुकरेजा व सौ सुरेखा कुकरेजा यांच्या वतिने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे ग्रामपंचायत च्या वतीने आभार आणि सन्मान करण्यात आला.




