शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम



मावळ मराठा न्यूज़, लोनावला – शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक १९ जून रोजी भांगरवाडी लोणावळा येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा क्रं ५ येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला पुरंदरे हायस्कूल येथील मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालाशिवसेना लोणावळा शहर संपर्क कार्यालयात वर्धापनदिनानिमित्त नागरिकांसाठी ” मोफत आधार कार्ड कॅम्प ” चे आयोजन करण्यात आले आहेया कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश भाऊ केदारी, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका सल्लागार मारूती खोले, नगरसेवक शिवदास पिल्लै, नगरसेविका सिंधु परदेशी, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, शहरसंघटक सुभाष डेनकर, समन्वयक जयवंत दळवी जेडी, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख प्रकाश पाठारे, सल्लागार रामभाऊ थरकुडे, महिला आघाडी उपतालुका संघटिका सौ संगिताताई श्रीकांत कंधारे, उपशहर संघटीका सुरेखा देवकर, उपशहर संघटीका श्रीमती प्रभाताई अकोलकर,अनिता गायकवाड, सीमा दिघे, प्रिया पवार, मा विभाग प्रमुख सुरेश टाकवे, अशोक भाऊ बोंद्रे, राजुभाऊ चव्हाण, ॲड दिपक चौधरी, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, विभाग प्रमुख संजय शिंदे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, उपविभाग प्रमुख प्रशांत आजगेकर, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, संदिप डेनकर, उपविभाग प्रमुख दिलीप गायकवाड, विभाग संघटक शेखर कारके, शाखाप्रमुख संतोष सुसलादे, शाखाप्रमुख सुनिल मराठे, श्रीकांत कंधारे, शाखाप्रमुख संजय जाधव, प्रमोद लोहिरे, उत्तम ठाकर, धीरज घारे, अक्षय साबळे, कुणाल सपकाळ, राजेश जांभूळकर, सचिन मराठे, गणेश तिकोणे, गणेश मातेरे व लोणावळा शहर शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते




