संपर्क बालग्रामच्या मुलींनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना बांधली राखी, पोलीस बांधव झाले भावूक



मावळ मराठा न्यूज़ ,लोणावला ,”नसेल जरी राखी तरी रक्षण करील खाकी” असे भावनिक उदगार पोलिस अधिकाऱ्यांनी काढल्यानंतर संपर्क मधील अनाथ मुलींना मोठा आधार वाटला, रक्षाबंधनाच्या दिवशी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशमध्ये खूप भावा बहिणीच्या प्रेमातील भावनिक वातावरण पाहायला मिळाले,पोलीस बांधवाना कर्तव्यामुळे आपल्या घरी किंवा आपल्या बहिणीकडे जाता येत नाही पण ही कमी दरवर्षी संपर्क बालग्राम च्या मुली व लोणावळा ग्रामीण च्या दक्षता समितीच्या महिला पोलीस बांधवाना राखी बांधून पूर्ण करतात.लोणावळा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सर्व मुलींचे स्वागत करून आदरांने राखी बांधून या छोट्या बहिणींना खाऊचे वाटप केले व आशीर्वाद दिला तर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व विश्वास दिला,नाही बांधली राखी तरी रक्षण करील खाकी,यावेळी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व दक्षता समितीच्या रतन देशमुख, विमल पवार, शांता मंडले आदिजन उपस्थित होते.कार्यक्रमाचे समन्वय प्रदीप वाडेकर यांनी केले.




