*लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज यांच्या वतीने चार गरीब कुटुंबाला महिनाभराचं किराणा किट वाटप*

मावळ मराठा न्युज- लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज आणि सदस्य,लायन जिल्हा अधिकारी,मित्र आणि हितचिंतक यांच्या वतीने इंदिरा नगर,म्युनिसिपल हॉस्पिटल, लोणावळा समोरील ठिकाणी येथे राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि अर्ध कोमात असलेल्या ४ जणांच्या कुटुंबासाठी एक महिना पुरेल असा एक संपूर्ण रेशन किट आणि सर्व किराणा सामान मोफत देण्यात आले. १ ऑगस्ट २०२५ रोजी कुटुंबासाठी महिनाभर पुरेल असा हा रेशन आणि किराणा किट भेट देण्यात आले. सदर प्रकल्प लायन्स क्लब लोणावळा सुप्रिमोज च्या अध्यक्षा एमजेएफ सुरैया वाडीवाला यांनी प्रायोजित केला होता. एमजेएफ सुप्रीमो अमीन वाडीवाला,(डीसी इमेज बिल्डिंग),एमजेएफ सुधीर कदम,(डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन),रंजना पुट्टोल,(क्लब सेक्रेटर) आणि विश्वनाथ पुट्टोल यांच्या उपस्थितीत देणगी देण्यात आली. टीम सुप्रीमो लोणावळ्यातील गरीब कुटुंबांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात.त्यांच्या या सामाजिक बांधिलकीला सलाम

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page