आता प्रचार संपला, २० ला मतदान कर्तव्य आणि २३ ला मावळ चा कारभारी कोण? बापू भेगडे की पुन्हा सुनील शेळके?

मावळ मराठा न्युज :- सत्तेची नशा राजकारण्यांना आंधळे करते,मागच्या वेळेस त्याचे बळी ठरलेत संजय उर्फ बाळा भेगडे आता सुनील शेळके ठरतात कां हे पाहणं ओत्सुकतेचे ठरणार आहे. लोकशाहीचा या उत्सवात मस्तवाल राजकारणी नाही मतदार हाच राजा असतो आणि तोच २० तारखेला ठरवेल मावळ चा कारभारी कुणाला करायचा? मतदार राजाला साड्या, पैसे देवदर्शन अशी अमिष दिले म्हणून त्याला कोणी गृहीत धरू नये तो आपले मत कुणाला द्यायचे हे नक्की ठरवतो.गुप्त मतदान यातून आपली ताकद राजा नक्की दाखवेल हे मस्तवाल राजकारणी यांनी लक्षात ठेवावे..मावळ,संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी मावळ विधानसभा ही मावळ वासियांनासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.मावळ तालुक्यामध्ये कधीच कोणी अशी निवडणूक पाहिली नसेल. २०१९ च्या वेळेस देखील एक वेगळीच चुणूक मावळ ने महाराष्ट्राला दाखवली. सुनील शेळके हे तळेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष वरून थेट आमदार झाले कारण त्यांनी आपली तयारी २ ते ३ वर्षे आधीच केली होती प्रत्येक गावागावात ते स्वतः व्यक्तिशः पोहचले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या (सरकारी नाही )कामाचा जोरावर सुनील शेळके घराघरात पोहचले होते. आणि भाजप मधून एका रात्रीत राष्ट्रवादी पक्षात जाऊन तत्कालीन विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना ९८ हजार अश्या प्रचंड मतांनी हरवले त्यावेळेस बाळा भेगडे यांनी तत्कालीन भाजप मध्ये असलेले सुनील शेळके यांना जर विधानसभा साठी तिकीट दिले असते तर त्यांना एवढ्या मतधिक्क्यानी पराभव पत्कारावा लागला नसता. त्यावेळी आताचे अपक्ष उमेदवार असलेले आणि २०१९ ला राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य दावेदार असलेले बापू भेगडे यांनी आपले मन मोठे करुन राजीखुशीने आणि पक्षाचा आदेश मानून शेळके यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले त्यामुळे शेळके पूर्वश्रमीचे भाजपचे असणारे मतदार शिवाय राष्ट्रवादी ची ताकद दोन्ही मिळाल्याने ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यावेळी शेळके यांनी सांगितले होते मला फक्त एकदाच संधी द्या म्हणत तिकीट मिळवले आणि जिंकलेही.पण राजकारणात नीतिमत्ता,शब्द,वचन आणि विश्वासहार्यता लयास गेली आहे.आणि सत्तेची चटक लागली की सत्तेच्या धुंदीत सर्व राजकारणी आंधळे होतात.मागच्या वेळेस बाळा भेगडे २ टर्म आमदार आणि मंत्रिपद मिळाल्याने सत्ता मोह सोडू शकले नाहीत. त्यामुळे मतदार राजाने घरी बसवले. तसंच आमदार शेळके २०१९ ला एकदाच संधी द्या म्हणाले होते आता त्यांनी मागच्या वेळेस संधी देणारे बापू भेगडे यांना आता म्हणजे २०२४ ला संधी दिली असती तर संघर्ष एवढ्या टोकाला गेला नसता आणि मावळची संस्कृतीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला झाले असते. आता जेष्ठ नेते मंडळी बापू भेगडे यांच्या कडे आहे आणि त्याचे २५,ते ३० वर्षाचे मावळ साठीचे योगदान मावळ वासियांना माहित आहे. सुनील शेळके यांनी ४ हजार कोटी हुन जास्त निधी आणला असला तरी सामान्य नागरिक म्हणून त्यांचे जीवन सुखकर झालेले दिसत नाही. आता ही निवडणूक २०१९ सारखी एवढी सोपी नाही. ४हजार कोटींचा निधी आणला विकास केला म्हटला तर तरुणाईला व्यसनधिन,महिलांना देवदर्शन, साड्या वाटप, पैसे वाटप,आदी गोष्टी करण्याची गरज कां भासते असा सवाल बापू भेगडे विचारणे स्वभावीक आहे. मागच्या वेळेस सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता मात्र अटीतटीची झाली आहे. घासून आणि ठासून होणारी निवडणूक आहे. थोड्याच फरकाने कोणताही एक उमदेवार ही निवडणूक जिंकणार आहे. ही निवडणूक दोन्ही उमेदवाराला सोपी नाही. महायुतीकडून मावळ विधानसभेसाठी आमदार सुनील शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. सुनील शेळके यांनी मागील पंचवार्षिक काळामध्ये केलेली विकास कामे व त्यांचा असलेला जनसंपर्क पाहता ही निवडणूक ते एकतर्फी करतील अशी परिस्थिती महिनाभरापूर्वी मावळ तालुक्यामध्ये होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला महायुती मधील भारतीय जनता पार्टीने विरोध दर्शवला होता. मात्र तो विरोध डावलत महायुतीकडून आमदार सुनील शेळके यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळाले ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील आपल्या पदांचे राजीनामे देत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिल्याने. त्या पाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे व मावळ तालुक्यामधील अन्य काही भाजपा पदाधिकारी यांनी आपल्या पदांचे राजीनामे देत महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.२० तारखेला मतदार राजा कोणाला विजयी करतो याचेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page