कुसगाव बुद्रुक येथील श्री भैरवनाथ तरुण मडंळाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रति श्रद्धा, प्रेम आणि जोश वाखानण्या जोगा

मावळ मराठा न्यूज:- कुसगाव,श्री भैरवनाथ तरुण मडंळ कुसगांव बु. यांनी गेल्या दोन दशकापासून शिवजन्मोउत्सवा मध्ये मावळ तालुक्यात आपले वेगळे २००५ पासून सुरु केलेला शिवजयंती उत्सव नक्कीच इतर मंडळाना प्रेरणा देणाराच आहे.मंडळामार्फत केली जाणारी जनजागृती सामाजिक बांधिलकी यामुळे मंडळाने आपले एक स्थान निर्माण केले आहे.शिवजन्मोत्सवानिमीत्त आणलेल्या भव्य शिवज्योत प्रेरणादायी ठरत आहेत मग तो ४५७ कि.मी. सिंधुदुर्ग वरून आणलेली शिवज्योत असुदे किंवा दुर्लक्षित असा छ. संभाजी महाराजाना बंदिस्त केलेला धर्मवीरगड असुदे ह्यांची दखल घेण्या सारखी आहे.तसेच मिरवणुकीतील वेगवेगळ्या देखाव्यामधुन समाज प्रबोधनाचे सादरीकरणही केले आहे.शिव कार्यात तरूणाचा वाढता सहभाग आणि मराठ्याचा धगधगत्या इतिहासाची जाण हाच ह्या मागचा खरा उद्धेश श्री भैरवनाथ तरुण मडंळाचा आहे,आज पर्यंत वेगवेगळ्या किल्ल्या वरून आणलेल्या भव्य शिवज्योत १) वर्ष २००५ किल्ले कोराईगड २४ कि.मी. ता. मुळशी, पुणे. २) वर्ष २००६ किल्ले राजमाची१९ कि.मी., ता. मावळ , पुणे. ३) वर्ष २००८ किल्ले लोहगड ११ कि.मी.ता.मावळ , पुणे. ४) वर्ष २००९ किल्ले कोराईगड २४ कि.मी. ता. मुळशी, पुणे.५) वर्ष २०१० किल्ले रायगड १६५ कि.मी. ता. महाड, रायगड ६) वर्ष २०११ किल्ले प्रतापगड २०७ कि.मी. ता.जावळी , सातारा ७) वर्ष २०१२ किल्ले राजगड १२९ कि.मी. ता. वेल्हे , पुणे. ८) वर्ष २०१३ किल्ले सज्जनगड १९१ कि.मी.ता.सातारा, जि.सातारा९) वर्ष २०१४ किल्ले सुवर्णदुर्ग २११ कि.मी. ता.दापोली , रत्नागिरी. १०) वर्ष २०१५ किल्ले रामशेज २५५ कि.मी. ता.दिंडोरी,जि.नाशिक,११) वर्ष २०१६ किल्ले धर्मवीरगड, १६७ कि.मी. ता.श्रीगोंदा ,जि.नगर,१२) वर्ष २०१७ किल्ले हरिहरगड,२६४ कि.मी.ता. त्रबंकेश्वर, नाशिक,१३) वर्ष २०१८ किल्ले शिवनेरी १२४ कि.मी. ता.जुन्नर ,जि. पुणे. १४) वर्ष २०१९ किल्ले विशाळगड, ३२१ कि.मी.ता.शाहुवाडी, कोल्हापुर,१५) वर्ष २०२० किल्ले सिंधुदुर्ग,४५७ कि.मी. ता. मालवण, सिंधुदुर्ग,१६) वर्ष २०२१ किल्ले राजमाची १९ कि.मी., ता. मावळ , पुणे,१७) वर्ष २०२२ किल्ले अंकाई-टंकाई,२८२ कि.मी.ता. येवला, नाशिक,१८) वर्ष २०२३ किल्ले पुरंदंर,११६ कि.मी. ता.पुरंदर ,पुणे,आणि ह्या वर्षी १९) वर्ष २०२४ किल्ले देवगिरी येथे जाऊन तब्बल ३३० कि.मी.,ता.दौलताबाद, छ. संभाजीनगर येथे जाऊन शिवज्योत आणली.असेच सातत्याने श्री भैरवनाथ तरुण मडंळ कुसगांव बु.च्या कार्यकर्त्याचा आणि शिवभक्तांचा उत्साह तसुभर ही कमी झालेला नाही.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page