*संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची ७५० वी जयंती लोणावळा नगरपरिषद कडून उत्साहात साजरी*

मावळ मराठा न्युज- लोणावळा,संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. दिनांक १५/०८/२०२५ रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची ७५० वी जयंती साजरी करण्यात आली . ७५० वी जयंती निमित्त लोणावळा नगरपरिषदेने दिनांक १५/०८/२०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांची मुर्तीची,पालखीतून दिंडी काढण्यात आली. या उत्सवात माजी नगरसेवक .नगरसेविका, सर्व कर्मचारी अधिकारी विविधपक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व गणेशोत्सव मंडळे,लोणावळेकर नागरिक यांनी दिंडीत सहभागी होऊन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली चा जयघोष केला यात नवमी भजनी मंडळ यांनी मावळा पुतळा ते लोणावळा नगरपरिषद माऊलीचा जयघोष करत, टाळ मृदूंगाचा निनादात फुगड्या खेळत दिंडीत सहभागी झाले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page