वडगाव शेरी येथे ओपन तायक्वांदो स्पर्धेत मास्टर राजू आगरवाल यांच्या मार्गदर्शनखाली मावळची चमकदार कामगिरी,२० सुवर्ण,२१ रजत आणि ७ कास्य पदक




मावळ मराठा न्युज – पुणे,ओपन तायक्वांडो स्पर्धा दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी रामचंद्र सभागृह, वडगाव शेरी पुणे येथे होरंगी तायक्वांडो असोसिएन व्दारा आयोजित करण्यात आले होते त्या मावळ तालुका आणि पुणे जिल्हातील विद्यार्थी व विद्यार्थीनि यांनी पुमसे व स्पीड किक या खेळामध्ये सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेमध्ये २२ सुवर्ण,२१ रजत, व ७ कांस्य पदकाची कमाई केली. त्यात १ विहान निलेश कुलकर्णी,अव्देत अनिरुद्ध केदारी,नक्ष जयेश राठोड,प्रदुम्न सचिन ढोले,प्रणव गोविंद जाकापुरे,हर्षवर्धन राजु वाघुले,आदित्य राकेश निखारे,यशवंथान जे.,देवेंद्र दिलीप मोरया,शौर्य ज्ञानेश्वर घाटकर,सिया अमित राठोड,साची सोमनाथ बेनगुडे,देविका सचिन जाधव,राजनंदिनी सुनिल मराठे,स्वरांजली किशोर वीर,भक्ती भरत बनसोडे,नव्या धनाजी थोरात,सिद्धी संदिप सुर्यवशी,नीता पंकज कारखानिस,स्वरा दिपक चव्हाण,शिवांग सागर भोईर,दिव्यांश शैलेश सिंग,ओवी विनीत मराठे,अर्जुन दत्तात्रय गोपाळघरे,अर्थव सुनिल मराठेया सर्व विद्यार्थ्यांनी गेली काही वर्षापासुन मावळातील तळेगाव येथे तायक्वांडो प्रशिक्षक मास्टर राजु अगरवाल (६ डॅन ब्लॅक बेल्ट कोरीया रिर्टन) १२ क्रिडा पुरस्कार विजेता यांच्या मार्गदर्शनाखली प्रशिक्षण घेतले आहे.या स्पर्धेसाठी कोच म्हणुन कु. वैशाली अगरवाल यांनी अथक परिश्रम घेतले आहे. या स्पर्धेत ७८० विद्यार्थांचा समावेश होता. त्यात आमच्या विद्यार्थानी यशस्वी वाटचाल केली. आणि पुढे करत राहतील. गेली ४० वर्षापासुन ही वाटचाल अशीच चालु आहे आणि पुढे अशीच सुरु राहील असे मास्टर राजू आगरवाल यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना सांगितले.




