संवेदना फौंडेशन चा अभिनव उपक्रम,२२ प्रशिक्षण निवासी विद्यार्थिनीना प्रमाणपत्र वितरण

मावळ मराठा न्युज – लोणावळा,संवेदना फाउंडेशन आदिवासी मुलींचे मोफत निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र लोणावळा या संस्थेमध्ये मागील तीन महिन्यापासून आदिवासी दुर्गम भागातील दहावी व बारावीची परीक्षा दिलेली मुली कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत होत्या २२ विद्यार्थिनी या प्रशिक्षणासाठी निवासी राहात होत्या यामध्ये मुलींना
१) कंप्यूटर एम एस सी आय टी
२) शिवण प्रशिक्षण ,शिवण मशीन दुरुस्ती
३) बेसिक ब्युटी पार्लर
४) मेहंदी
५) रांगोळी यामध्ये संस्कार भारती रांगोळी, ॲडव्हान्स रांगोळी गालिचा, इन्स्टंट रांगोळी, मॅट रांगोळी इत्यादीचे प्रशिक्षण घेतले
६) कृत्रिम दागिने बनवणे
यामध्ये बँगल वर्क गळ्यातले कानातले बनवणे
७) आरी वर्क ,हॅन्ड एम्ब्रोईडरी, पॅचवर्क ,व क्रोशे वर्क
८) लिपन आर्ट व मंडला आर्ट
९) विविध प्रकारचे फुले बनवणे
१०) विविध प्रकारच्या बॅग बनवणे
११) कोल्ड सिरॅमिक बनवणे
इत्यादी प्रशिक्षणे १ एप्रिल पासून ३० जून पर्यंत या कालावधीमध्ये आदिवासी मुलींनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत
या सर्व प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम ३०/६/२०२६ रोजी संवेदना फाउंडेशन लोणावळा येथे घेण्यात आला.
प्रमुख पाहुण्या युनिटा डॉलडन मॅडम कविताताई मोरे मॅडम तसेच संस्थेचे अध्यक्ष :श्री रमेश बोंद्रे, उपाध्यक्ष :सोनाली शेळके, सचिव :श्री दीपक मावकर, कोषाध्यक्ष: रवी शेळके सदस्य: दिनेश पाटील तसेच गुरुकुल हायस्कूलचे शिक्षक भूषण शिरवडे,मुंबईचे जाधव, मुंबईच्या सुशीला मॅडम,
संस्थेच्या ब्युटी पार्लरच्या प्रशिक्षिका सौ.ज्योती चव्हाण, श्री.रमेश चव्हाण,
कम्प्युटरच्या प्रशिक्षिका लतिशा शर्मा, विनया बोरकर इतर प्रशिक्षण देणाऱ्या रेणुका मालपुटे आयुषी बडेला उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page