स्वर्गीय वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय एसएससी बोर्डच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सिल्याबस ॲप कार्डचे वितरण







मावळ मराठा न्युज- दिनांक १४ ऑगस्ट रोजी स्वर्गीय वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय करंडोली येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी बडी कुपन हे वितरण करण्यात आले रोटरीच्या नूतन अध्यक्ष विजया कल्याण पाच प्रेसिडेंट नितीन कल्याण प्रोजेक्ट डायरेक्टर रवींद्र कुलकर्णी मुख्याध्यापक बापू पाटील देशमुख सर वगैरे उपस्थित होते 35 विद्यार्थ्यांना याचे प्रात्यक्षिक दाखवून कार्ड वितरित करण्यात आले वापरण्यास अतिशय सोपे असल्याने व सर्व विषयांचे सिल्याबस कव्हर झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होऊन विषयाचा सखोल अभ्यास करण्यास या ॲपची खूपच मदत होणार आहे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास व स्वतंत्र अभ्यास करण्यास ॲपची मदत होणार आहे. मुख्याध्यापक पाटील सर यांनी प्रास्ताविक केले रोटेरियन यांनी प्रात्यक्षिक दाखविले प्रोजेक्ट डायरेक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी त्याचे महत्त्व विशद केले. अध्यक्ष विजया कल्याण यांनी मुलांना ॲप वापरून प्रगती करण्याचा व शाळेचे नाव उज्वल करण्याचा संदेश दिला.




