लायन्स क्लब तळेगाव संचलित,कराटे,स्केटिंग आणि बॅडमिंटन या विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त खेळपटूंचा सन्मान







मावळ मराठा न्युज-तळेगाव,लायन्स क्लब तळेगाव संचलित,कराटे,स्केटिंग आणि बॅडमिंटन या विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त खेळपटूंचा गुरुजनांच्या- पालकांच्या आणि लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं- यथोचित सन्मान करण्यात आला! याबरोबरच कराटे प्रशिक्षक- श्री प्रफुल्ल कवळे! स्केटिंग प्रशिक्षक- श्री राहुल लोंबर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक- श्री युवराज पारगे!- यांचाही यथोचित गौरव करण्यात आला! या अत्यंत देखण्या समारंभाचे अध्यक्ष लायन राजेंद्र झोरे यांनी- सर्व उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले! हेल्थ क्लबचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत थिटे यांनी आंतरराष्ट्रीय लायन संघटनेची कार्यप्रणाली सांगून आपल्या हेल्थ क्लबची स्थापना आणि त्यामागील उद्दिष्ट या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले! आपल्या पाल्यांचं- शारीरिक- मानसिक आरोग्य संवर्धन संदर्भात- ज्येष्ठ लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी भाष्य करताना- विद्यार्थ्यांना आणि पालकांना आहार विहार आणि विचार या सर्वांच आपल्या व्यक्तिमत्व विकासातील अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले! पोटात पित्त- प्रपंचात वित्त आणि परमार्थात चित्त असेल तरच जीवनाला महत्त्व प्राप्त होतं हेही त्यांनी आपल्या भाषणात विशद केले! प्रसिद्ध उद्योगपती- रोटेरियन विलासजी काळोखे आणि काही पालकांनी- तळेगाव परिसरातील तरुणाईत विविध क्रीडा क्षेत्रात गेली पंचवीस वर्ष सातत्याने आवड निर्माण करण्याचं काम लायन्स क्लब तळेगावने उत्तम प्रकारे राबविल्याबद्दल लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करून ऋणही व्यक्त केले! विद्यार्थ्यांमध्ये जोश निर्माण करणारा हा देखणा समारंभ- शंभर टक्के यशस्वी होण्यास मा हेल्थ चेअरमन लायन एडवोकेट मनोहर दाभाडे आणि त्यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेतल्यानेच हा अविस्मरणीय सोहळा आनंददायी ठरला ! या उत्कृष्ट बक्षीस समारंभाच विशेष सूत्रसंचालन बॅडमिंटन कोच युवराज पारगे आणि स्केटिंग प्रशिक्षक श्री राहुल लोंबर यांनी केले! लायन भरत पोतदार यांच्या आभार प्रदर्शन केले.



