वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड.दीपक चौधरी यांची निवड



मावळ मराठा न्यूज:- वडगाव,वडगाव मावळ लिगल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोणावळ्यातील जेष्ठ वकील ॲड दीपक रमेश चौधरी यांची सन २०२३ – २०२४ साठी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी वडगाव न्यायालयाच्या बार हाॅलमध्ये झालेल्या बैठकीत जेष्ठ विधी तज्ञ एल एम कौशल, ॲड.नामदेवराव दाभाडे, ॲड. धनंजय कोंद्रे, ॲड. रंजना भोसले आदी वकील सहकारी यांच्या प्रमुख उपस्थित ॲड.दीपक चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.यात अध्यक्ष पदी दीपक चौधरी तर उपाध्यक्ष पदी सोमनाथ पवळे आणि मीनाक्षी ढोरे यांची निवड करण्यात आली.तर खजिनदार पदी ॲड प्रिया पंडित यांची तर सचिव पदी लोणावळ्याच्या ॲड मोनाली कुलकर्णी शेलार याची सचिव पदी निवड झाली असून राम शहाणे, प्रनोती पिंगळे,साक्षी मोरे,रोहिणी मुथा,प्रियांका शिंदे,प्रतीक देशमुख, अक्षय रौंधळ, मोझेस बनसोडे,अविनाश शिंदे,प्रदीप ढोकर,सागर शेटे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. ॲड दीपक चौधरी यांच्या सर्व नवीन कार्यकारिणी ला मावळ मराठा न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.




