कोजागिरी पौर्णिमा अनिका पिकॅडिली मध्ये उत्साहात साजरी



मावळ मराठा न्युज :- पुनावळे बाजार,पुनावळे पुणे- ३३,अनिका पिकॅडिली सोसायटीच्या सभासदांनी स्त्री पुरुष, आबालवृद्ध रहिवाशांनी वेगवेगळ्या खेळांत उत्साहाने भाग घेतला. तळ्यात मळ्यात, अभिनयावरून सिनेमा ओळखणे, आदि अभिनव खेळ घेण्यात आले. सर्वांना प्रवेश खुला होता. जिंकलेल्यांना लगेच बक्षिस वाटप करण्यात येत होते. प्रथम क्रमांक विजेती चंचला महाले सौ. माधुरी वैद्य कुमठेकर, सौ. सारिका पाटील यांना डॉक्टर साई प्रसाद, संयोगिता देशपांडे पाटील यांना त्यांच्या पतीच्या हस्ते, तर सौ. मेढेकर यांना मा. नितीन तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. समारोप प्रसंगी सर्वांना मसाला दूधाचे वाटप करण्यात आले.




