NCMC ST CARD 2026 एस टी कार्ड शिबीराचे आयोजन








मावळ मराठा न्युज -यमुनानगर निगडी -दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्या ज्येष्ठ सभासद व त्यांचे कुटुंबीय आणि यमुना नगर मधील नागरिकांसाठी NCMC ST CARD हा उपक्रम आयोजित केला. या उपक्रमास यमुना नगर मधील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 106 नागरिकांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. उर्वरित सभासदांसाठी व नागरिकांसाठी लवकरच पुन्हा एकदा हा उपक्रम हाती घेण्यात येईल. या कार्यक्रमाचे बहुसंख्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री गजानन ढमाले श्री चंद्रकांत सुर्वे श्री प्रदीप मुजुमदार श्री दत्तात्रय गुंजाळ श्री प्रदीप पाटील व श्री अशोक नहार यांनी परिश्रम घेतले.



