लोणावळा महाविद्यालयाचे अजीवली येथे हिवाळी शिबिराचे उद्घाटन

मावळ मराठा न्यूज,लोणावळा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर अजिवली गावात उद्घाटन समारंभ पार पडला. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डी.जे.दरेकर, बबाताई किसन लायगुडे (तंटामुक्ती अध्यक्ष )आणि रूपालीताई अंकुश लायगूडे (माजी उपसरपंच, अजिवली) यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये स्वयंसेवक गाव परिसरातील बंधारे बांधणार आहेत, स्वच्छता अभियान, गावातील अंतर्गत रस्ता दुरुस्ती, अंधश्रद्धा निर्मूलन ,शोषखड्डे, कुटुंब सर्वेक्षण, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, व्यसनमुक्ती व आरोग्य विषयक जनजागृती करणार आहेत ,असे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन शिंगारे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्षा बबाताई लायगुडे यांनी समानतेचे, विकासाचे ,स्त्रीभ्रूणहत्येविषयी माहिती दिली आणि खोदकामाच्या साहित्याचे जीवनात किती महत्त्व आहे याबद्दल विशद केले. महाविद्यालयाचे प्रभावी प्राचार्य डॉ.डी.जे.दरेकर यांनी समाज प्रबोधन पर कवितेच्या माध्यमातून माहिती सांगितली. महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागाचे महत्त्व जीवन जगत असताना किती अमूल्य आहे, याविषयी आपले मनोगत व्यक्त केले .या उद्घाटनच प्रसंगी बबाताई लायगुडे (तंटामुक्ती अध्यक्ष), रुपालीताई लायगुडे( माजी उपसरपंच अजिवली), महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी.जे दरेकर ,कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. राहुल सलवदे, प्रा. संदीप लबडे, प्रा. रोहन वर्तक, प्रा. भूषण गोंदके, प्रा. अमोल नवगिरे ,प्रवीण चव्हाण व गावकरी मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली सातकर यांनी केले. कार्यक्रमाचे आधार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. धनराज पाटील यांनी केले.अजिवली गावचे सरपंच श्री अमोल गोणते ,उपसरपंच छायाताई गोणते ,तसेच लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री रमेशचंद्रजी नय्यर, सचिव मा. श्री दत्तात्रय पाळेकर, एडवोकेट नीलिमा खिरे, सदस्य मा. श्री दत्तात्रय येवले या मान्यवरांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page