प्रा.श्री.धनराज पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्राप्त






मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,वलवन,लोणावळा येथील प्राध्यापक धनराज पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार देण्यात आला.त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशन इंडिया ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था,या संस्थेच्या वतीने सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.दीपक आर्वे सर यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रसिद्ध लेखक सचिन वायकुळे, आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय पवार (पत्रकार),श्री.जब्बार शिकलगार, श्री. ए. बी. शेख,श्रीमती सुनिता केदार,संघटनेचे पदाधिकारी व पुरस्कारार्थी आणि त्यांचे नातेवाईक-मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रमेशचंद्र नैय्यर,उपाध्यक्ष श्री.दत्तात्रय पाळेकर,सचिव एडवोकेट नीलिमा खिरे, खजिनदार श्री. दत्तात्रय येवले, विश्वस्त श्री.नंदकुमार वाळंज, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख सर, महाविद्यालय विकास समितीचे श्री.विशाल पाडळे, डॉ. दिगंबर दरेकर सर,कनिष्ठ विभाग प्रमुख वर्गीस मॅडम, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राध्यापक पाटील सर यांचे अभिनंदन केले.



