कोण होणार लोणावळ्याचे महागायक,महागायिका?१२ मार्चला भोंडे विद्यालयात होणार गीत गायन स्पर्धा

मावळ मराठा न्यूज:-लोणावळ्यांत प्रथमच हौशी कलाकारांसाठी भव्य अशी गीत गायन स्पर्धेचे आयोजन आधार फाउंडेशन च्या वतीने होत असून विजेत्यांना भव्य बक्षिसे दिली जाणार आहेतआधार फाउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश पाठारे आणि प्रसिद्ध निवेदक गायक प्रदीप वाडेकर या कार्यक्रमाचे नियोजन करत असून दोन मार्च पर्यंत नाव नोंदणी घेतली जात आहेया स्पर्धेत विशेषता जेष्ठ कलाकार नागरिकांना संधी देण्याचे उद्देशाने ५० वर्षापुढील एका गटात स्पर्धा व पारितोषिके ठेवण्यात आली आहेत यामध्ये २० ते ५० गट व ५० वर्षापुढील एक गट अशी स्पर्धा असेल यामध्ये दोन्ही गटात एक महागायक व एक महागांयिका निवडली जाईल हिंदी मराठी गीतामध्ये दोन निवड फेरीतून फायनल ला ठराविक स्पर्धक असतील स्पर्धा करोके ट्रक वर घेतली जाईल प्रत्येक्ष लाईव्ह संगीतावर ज्यांना गायचे आहे त्यांना आपले वादक आणावे लागणार आहेअंतिम फेरी व बक्षीस समारंभ बापूसाहेब भोंडे विद्यालयात होणार आहेफायनल फेरीत पुण्यातील दिग्गज गायक मंडळी परीक्षक म्हणून उपस्थित असतील.लोणावळ्यातील या माहागायक, महागायिका गायन स्पर्धेत सर्व कलाकारांनी भाग घ्यावा व रसिक प्रेक्षकांनी त्यांना प्रोत्साहांन देण्यासाठी १२ मार्चला कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मावळ वार्ता युट्युब चॅनल वर केले जाणार आहे नाव नोंदणी साठी संपर्क क्र.९८८१०२४०४८ ९९२३१५१७७०

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page