लोणावळा नगरपरिषद सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेच्या खजिनदार पदी जितेंद्र राऊत तर सचिवपदी अनिल अकोलकर यांची बिनविरोध निवड




मावळ मराठा न्युज -लोणावळा, लोणावळा नगरपरिषद सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेच्या खजिनदारपदी जितेंद्र बबन राऊत व सचिवपदी अनिल अशोक अकोलकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी मनिषा जरे व सहाय्यक वंदना तळपे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक कार्यालयात वडगाव मावळ येथे ही निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी खजिनदार पदासाठी जितेंद्र राऊत व सचिव पदासाठी अनिल अकोलकर या दोघांचेच अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संस्थेच्या श्रीमती जयश्री राणवे,उपाध्यक्ष मुरलीधर कांबळे,संचालिका श्रीमती स्वाती गायकवाडमाजी अध्यक्ष सुभाष बलकवडे, संचालक सुर्यकांत हाळुदे, चेतन सारवान,संतोष गिरी, बबन कांबळे, तारीष राणवे आणि व्यवस्थापक दशरथ गावकर,हे उपस्थित होते.




