लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा आणि मनशक्ति केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आणि खाऊ वाटप








मावळ मराठा न्यूज-लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा आणि मनशक्ति केंद्र संयुक्त यांच्या विद्यमाने सोमवार,दिनांक १६.०९.२०२५, नांगरगाव येथे लोकमान्य टिळक विद्यालय क्रमांक ८ आणि वळवण येथील महात्मा गांधी विद्यालय-जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य शिबीर यशस्वी पार पडले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.त्या वेळेस लायंन्स क्लब लोणावळा चे अध्यक्षा लायन कांता पोपट ओसवाल, लायन निराली देवेंद्र नाळेकर, लायन अश्विनी मंगेश कदम, लायन दिपाली विरल गाला, लायन डाॅ. पोपट ओसवाल – डिस्टिक्ट मेडिकल अँक्टिविटी चेअरमन आणि मनशक्ती केंद्राचे डाॅक्टर गोसावी व सर्व टिम आणि नंदकिशोर उर्फ राजाजी खंडेलवाल हजर होते.



