श्रीमद सद्गुरू श्री. पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर हार्मोनियम,तबला,पखवाज,गायन यां सर्वं कलांचे मोफत शिक्षण देणारी संस्था


मावळ मराठा न्यूज़ :-पुणे, ग्रामीण भागातील मुलांना तबला, हार्मोनियम, पखवाज, गायन इ. कला शिकायला मिळत नाहीत त्यांनाही या कला शिकायला मिळाव्यात म्हणून श्रीमद सद्गुरू श्री. पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर यां संस्थे मार्फत यां सर्वं कलांचे मोफत शिक्षण, मारणेवाडी, नांदेडगाव / सिटी, भुगांव यां शाखा मधून गुरुवर्य ह. भ. प. श्री. जानकीराम जगताप हे विना मानधन शिकवत असतात यां वर्षी संस्कार वर्गा मार्फत भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यां विद्यापीठा मार्फत घेण्यात आलेल्या तबला, व हर्मोनियम परीक्षेत (१/२री ) नांदेडसिटी / गाव शाखेच्या ३० मुलांनी सहभागी होऊन सर्वांनी विशेष प्राविण्या सह प्रथम श्रेणी प्राप्त केली कू. मयांक दारवटकर, कू. श्रुष्टि माळी कू. तेजल पवार कू. अंजली इंगळे यांनी विशेष प्रावीन्य प्राप्त केले पालक व परिसरातील नागरिक मुलांचे व गुरुवर्य जानकीरामजी यांचे कौतुक करून अभिनंदन करत होते.




