लोणावळा नगरपरिषदेचे डम्पिंग ग्राउंडवरील आग नि धूरामुळे वरसोलीच्या ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात


मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा नगरपरिषदेचे वरसोली येथील डम्पिंग ग्राऊंड वर गेल्या ३ दिवसा पासून कचरा डेपोवर आगीचा डोंब होत असून त्याचा धूर सर्वत्र पसरून नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. लहान मुलांना श्वास, घेण्यास तसेच घसा दुखणे हे त्रास सर्व गावात जाणवत आहे अशा वेळी तर दुर्गंधी बरोबर धुराचा ही त्रास सहन करावा लागतो आहे यामुळे वरसोली येथील नागरिकांचा आरोग्याला खूप धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना वारंवार सर्दी, खोकला व श्वासाचा त्रास होत आहे. या डेपो जवळ मनशक्ती प्रयोग केंद्र, रामानंद शास्त्री जेष्ठ नागरिक निवास, व्हिपीओस शाळा, कॉलेज, टोलनाका व हॉटेल्स आहेत. सर्वांच्याच आरोग्यासाठी हे धोकादायक ठरत आहे. कचरा डेपो मुळे वरसोली परिसरातील भूगर्भातील पाणी दुषित झाले आहे. सदर कचरा डेपो विषयी योग्य उपाय योजना करून दुर्गंधी व आग विजावण्यासाठी त्वरीत व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वरसोली ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच संजय खांडेभरड आणि ग्रामसेवक दीपक शिरसाठ यांनी लेखी पत्रद्वारे लोणावळा नगरपरिषदेकडे केली आहे.




