डॉ.दिलीप भोगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा स्वभाव,आणि आठवणींना उजाळा दिला आहे डॉ शाळीग्राम भंडारी यांनी

मावळ मराठा न्युज – तळेगाव,डॉ.दिलीप भोगे या खान्देशी रत्नाला एका खान्देशी रत्नाची श्रद्धांजली. डॉ भोगे आपल्यात नाहित,त्यांच अस्तित्व संपलं असलं तरी आठवणी मात्र माझ्यासारख्या हजारोंनी आपल्या मनाच्या शिंपल्यात मोत्यासारख्या जपून ठेवलेल्या आहेत!—— अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती……मित्रांनो, ज्यावेळी आपल्या सर्वांचे परममित्र डॉक्टर दिलीप भोगे सरांच्या मृत्यूची बातमी ऐकली, मन सुन्न झालं! .माझ्या कानावर माझाच विश्वास बसत नव्हता. त्याचं कारणही असंच होतं की , प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणार–असं हे सरांचं व्यक्तिमत्व! एकाएकी काळाच बोटधरून आपल्यातून निघून जावं हे माझं मन मानायलाच तयारच नव्हतं! डॉक्टर शशिकांत पवार सरांनी शोकसंदेशात म्हटल्याप्रमाणे डॉक्टर दिलीप भोगे सरांच्या स्वभावाचे अनेक पैलू होते! पण त्यातल्या– सर्व गुणांचा राजा म्हणजे नम्रता! हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण असल्यामुळे , भोगे सर त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला हवेहवेसे वाटायचे. एवढेच नव्हे तर त्यांच्या मिश्कील स्वभावामुळे वातावरणात नेहमीच हास्याचे कारंजे उडायचे.!मित्रांनो–,उत्तम हस्ताक्षर आणि आणि अत्यंत अभ्यासू वृत्तीमुळे डॉ भोगेनी तळेगाव जनरल हॉस्पिटल च्या व्यवस्थापनात स्वताला झोकून दिल होते .तेवढ्याच क्षमतेने लायन्स क्लब अध्यक्ष आणि विविध पदावर कार्यरत असताना त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पडली होती .मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाबरोबरच आदर्श डॉक्टर ची गुणवत्ता कशी असावी त्याचा वस्तुपाठ ते प्रत्यक्ष आपल्या कृतीतून सादर करायचे!.हे सर्व व्याप सांभाळत असताना आपला चिरंजीव डॉक्टर रोहित आणि सुपुत्री निलांबरी यांनाही उत्तम संस्कार, शिक्षण देऊन आपली कौटुंबिक जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडली होती! या सर्व कौटुंबिक ,व्यवसायिक, सामाजिक जबाबदाऱ्या पार पडताना त्यांच्या सुविद्य पत्नी उषा वहिनी या भक्कमपणे त्यांच्या मागे उभ्या राहिल्यात म्हणूनच सर्वार्थाने डॉक्टर भोगे सरांना यश मिळत गेलं!डॉक्टर भोगे यांनी आपल्या अविरत वैद्यकीय रुग्ण सेवेतून रुग्णांच्या हृदयात एक अढळ स्थान प्राप्त केलं होतं. केवळ मावळ तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक वैद्यकीय, शैक्षणिक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील संस्था तसेच संस्थाचालक यांचे डॉक्टर भोगेशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते म्हणूनच डॉक्टर या अर्थाने रावा पासून रंकापर्यंत अंशा अंशाने वाटत गेलेल अस एकमेव व्यक्तिमत्व माझ्या सहवासात आलेलं होतं, अस मी मानतो!मित्रांनो, ते खानदेशी ,मी खानदेशी त्यामुळे आमच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं.डॉक्टर भोगे सरांच्या अशा सर्वव्यापी जीवनशैलीमुळे त्यांच्या आयुष्यात अनेक मानसन्मानाची गुढ्या तोरणे उभारून त्यांना सन्मानित करण्यात आल! पण त्याचबरोबर जनसामान्यांच्या तुळशीवृंदावनासमोर त्यांना नतमस्तक होताना मी ज्या ज्या वेळी पाहायचो त्यावेळी अवघ तारांगण त्यांना आशीर्वाद देतोय अशी अनुभूती मी अनुभवायचो!”काय शाळ्या “अशी अतिशय प्रेमळ, लाडिक डॉक्टर भोगे सरांची अचानक हाक कुठून तरी माझ्या कानावर येईल अशी वेडी आशा अजूनही माझं वेडावलेल् मन बाळगतो आहे !मित्रांनो– ,काळ कुणासाठी थांबत नाही! तो अखंड धावत असतो!त्याच्या पावलांचा आवाज येत नाही, त्याच्या पुढील मार्ग अमर्याद असतो,आणि या मार्गावर दोन्ही बाजूला आपली आयुष्य असतात ! मित्रांनो- हा काळ आपल्याला कधी भेटवतो ,कधी अलगद दूर करतो! ,आज या काळानेच भोगे सरांना अशा ठिकाणी नेलेल आहे की, जीथे परतीचा मार्गच नाही!.. परममित्र डॉक्टर दिलीप भोगे यांच्या स्वर्गस्थ आत्म्यास चिरशांती लाभो हीच त्या परमेश्वर चरणी प्रार्थना! आपल्या सर्वांच्या वतीने हीच त्यांना श्रद्धांजली! शोकाकुल-लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे पुणे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page