कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत,सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर



मावळ मराठा न्यूज: – लोणावळा,ग्रामपंचायत कुसगाव बुद्रुक आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कुसगावच्या विद्यमान सरपंच अश्विनीताई ज्ञानेश्वर गुंड, ज्ञानेश्वर गुंड, ग्रामपंचायत सदस्य सुजाता ठुले, सदस्या फरीन शेख, सदस्या शैला मोरे,ग्रामपंचायत सदस्य राजेश काटकर, सदस्य गणेश गुंजाळ, युवानेते लहू गुंड पाटील, ऋषिकेश ठुले, प्रफुल्ल गुंड, उद्योजक भरत फाटक, प्रोफेसर निकिता सिंगल, कॅम्पस डायरेक्टर एम एस गायकवाड ,एचओडी फार्माकोलाँजीचे राजेश गायकवाड, असिस्टंट प्रोफेसर,प्रमिला पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




