लोणावळा शहरातील हनुमान टेकडी येथून ते कैलासनगर,पांगारे चाळ येथे संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचाराचा समारोप,नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद




मावळ मराठा न्युज :-लोणावळा, मावळ लोकसभा,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री.संजोगभाऊ वाघेरे पाटील यांच्या प्रचाराच्या आज सहाव्या दिवसा निमीत्त लोणावळा शहरातील हनुमान टेकडी येथुन प्रचाराला सुरूवात करण्यात आली.हुडको,कैलासनगर,पांगारे चाळ येथे प्रचाराचा समारोप करण्यात आला.यावेळी नागरीकांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेऊन परीचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. लोकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला.यावेळेस महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकारी नगरसेवक,नगरसेविका,महिला आघाडी,सेवादलच्या महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.




