लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचा गरबा स्पर्धा आयोजनात सहभाग

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स क्लब लोणावळा खंडाळा आणि अमित सूर्यकांतजी लुनावत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गावठाण येथील श्री शीतलादेवी माता मंदिर परिसरात भाविकांसाठी भव्य गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व मानचिन्हे प्रदान करण्यात आली.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब अध्यक्ष कांता ओसवाल, खजिनदार अश्विनी कदम, झोन चेअरपर्सन MJF लायन देवल पारिख, डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पोपट ओसवाल, अभय जैन, अमित लुनावत, विरल गाला, मंगेश कदम, जिगर पटवा, प्रकाश जैन, जयश्री सुराणा, रिंपल पटवा, सीमा पारख, रंजू लुनावत, दीपाली गाला आदी मान्यवर उपस्थित होते.विजेत्यांना ट्रॉफी तसेच भेटवस्तू देण्यात आल्या. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन लायन दीपती लुनावत व कांचन लुनावत यांचा सहभाग लाभला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page