आपदा मित्र मावळ पुणे व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने१३ ऑक्टोबर आपत्ती निवारण दिन साजरा


मावळ मराठा न्यूज़:- तळेगाव ,अॅड पु.वा .परांजपे विद्या मंदिरात आपत्ती निवारण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पांडुरंग पोटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सौ. ममता राठोड (उपमुख्या धिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद), आपदा मित्र मावळ पुणे श्री. निलेश गराडे, संस्थापक वन्यजीव रक्षक संस्था श्री. अमित गुरव (तज्ञ गिर्यारोहक) , श्री .जिगर सोलंकी (वन्यजीव रक्षक संस्था सदस्य ) श्री. संदीप चव्हाण (वन्यजीव रक्षक संस्था सदस्य )हे सर्व मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार शाल,रोप देवून करण्यात आला. श्री. अमित गुरव सर यांनी आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम त्यासाठी लागणारे प्रतिबंधक उपाय याविषयी सविस्तर माहिती आपल्या साध्या सरळ शैलीतून विद्यार्थ्यांना समजून सांगितली. त्याचप्रमाणे श्री. जिगर सोलंकी यांनी गॅस सिलेंडर वापरत असताना कोणती काळजी घ्यावी ,वन्य प्राण्यांचे फायदे, वन्य प्राण्यांपासून जर आपल्याला इजा झाली असेल तर काय उपाययोजना करावी याविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्याचप्रमाणे भूकंप झाल्यानंतर आपण जर शाळेत असेल तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून समजून सांगितले. त्याचप्रमाणे सौ. ममता राठोड मॅडम यांनी आपत्ती कोणती असो ती आल्यानंतर आपण आपला बचाव करणे आणि आपल्याबरोबर इतरांचे रक्षण कसं करावं याविषयी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून माहिती दिली. १० ऑक्टोबर रोजी कु. ईश्वरी मोहन झुंजुरके इ. ६ अ मधील विद्यार्थ्यांनी ३० किलो वजनी गटामध्ये ‘ खाशाबा गायकवाड कुस्ती संकुल’ पुणे यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेती झाली तिचाही या ठिकाणी सौ .ममता राठोड मॅडम व निलेश संपतराव गराडे यांच्या हस्ते आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या अध्यापिका सौ. सुजाता कातोरे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.कमल ढमढेरे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




